Kalu waterfall undoubtedly is the highest waterfall in Malshej Ghat & falls from a height of about 1200 feet. The waterfall originates from Harishchandragad and subsequently flows through the Khireshwar village. आकाशाला भिडलेल्या उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळत फेसाळत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यांवर हळुवार सरकणाऱ्या दाट ढगांची गर्दी, त्यातून वळणे घेत मधेच बोगद्यात जाणारा रस्ता हे अनुभवायचे असेल तर नगर - कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवे. जवळच खुबी गावाजवळ पिंपळगांव धरणाचा सुंदर जलाशय आहे. या घाटाचा घाटमाथ्यावरील भाग पुणे जिल्ह्यात तर घाटातील मुख्य भाग हा ठाणे जिल्ह्यात येतो. पुरातन काळापासून प्रसिद्ध असलेला महाराष्ट्रातील एक घाट. इथली खासियत म्हणजे ’रोहित पक्षी’ इंग्रजीत फ्लेमिंगो म्हणून ओळखले जाणारे हे परदेशी पाहुणे दरवर्षी या जलाशयात येतात. माळशेज हा मुख्य घाट रस्ता असल्याने एसटीच्या बऱ्याच गाड्या पुण्या-मुंबईहून ये-जा करत असतात. स्वतःच्या वाहनाने गेल्यास पुण्याहून एक दिवसाची पावसाळी सहल सहज घडेल. माळशेज घाटातल्या रेस्ट हाउसच्या मागे हरिश्‍चंद्र गडाची उत्तुंग डोंगररांग पसरलेली आहे. समोरच्या दरीच्या तळात घनदाट जंगलामुळे इथे ससा, घोरपड, मुंगूस, बिबळ्या अशा वन्य प्राण्यांचा वावर असतो. सैबेरियातून येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे घाटाच्या अलीकडे डोंगरवाडीजवळच्या शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात भक्ष्य टिपायला जुलै ते सप्टेंबर महिन्यात येतात. पावसाळ्यात माळशेज घाटाकडे जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो. तीन धारांमध्ये कोसळणारा हा धबधबा पहाण्यासाठी फक्त पावसाळ्यातच जावे लागते. कसे जातात? पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. ठाणे जिल्ह्यातल्या शहापूरवरून किन्हवली सरळगाव मार्गे माळशेज घाटाकडे जाता येते. महाराष्ट्राच्या इतर भागातून येणारया लोकांसाठी राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ हाच मुख्य मार्ग असून मराठवाडा, विदर्भातील लोक याच मार्गाने माळशेज घाटात येतात.

kalu waterfall trekkalu waterfall trek malshej ghat maharashtrakalu waterfall whatsapp statuskalu waterfall malshejkalu waterfall 2023kalu waterfall latest videokalu waterfall latest newskalu waterfall recent videoskalu waterfall recent vlogmalshej ghat in monsoonmalshej ghat waterfallmalshej ghat waterfall 2023malshej ghat hidden places